आरोग्य मंत्र्यांच्या भेटी, चर्चेनंतरही स्थिती जैसे थे

कोल्हापूर : आरोग्य मंत्र्यांच्या भेटी आणि चर्चेनंतरही कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यतील दुकाने सुरू होण्याबाबतचा संभ्रम शुक्रवारी कायम राहिला. कोल्हापूर जिल्हा करोना नियमावलीच्या चौथ्या टप्प्यात आहे. तो तिसरम्य़ा टप्प्यात आल्यानंतर दुकाने सुरू होऊ  शकतील, असे मंत्री     राजेश टोपे यांनी पत्रकारांना सांगितले. तर, व्यापाऱ्यांच्या तीव्र संघर्षांला यश आले असून  सोमवारपासून जिल्ह्यतील सर्व व्यापार सुरू होतील असा दावा टोपे यांच्या भेटीनंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने केला आहे.

कोल्हापूर शहरातील व्यापारम्य़ांनी दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता टोपे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा करोना नियमावलीच्या तिसरम्य़ा टप्प्यात  पोहोचण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याबाबत नूतन जिल्हाधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यांची बैठक होईल. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून याबाबतची भूमिका जाहीर केली जाईल, असे टोपे यांनी स्पष्ट केल्याने कोल्हापूरसह जिल्ह्यतील दुकाने नेमके कधी सुरू होणार, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

शहर, जिल्ह्य़ातील व्यापारी संघटनांचा दावा

कोल्हापूर जिल्ह्यतील सर्व प्रकारचे व्यापार सुरू करण्याच्या मागणीसाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ च्या पुढाकाराने शहर व जिल्ह्यतील विविध व्यापारी संघटना व व्यापाऱ्यांच्यावतीने शासनाशी केलेल्या तीव्र संघर्षांला अखेर यश मिळाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री टोपे यांनी जिल्ह्यतील सर्व व्यापार सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले जातील, असे स्पष्ट आश्वासन दिल्याने सोमवार (१९ जुलै) पासून जिल्ह्यतील सर्व व्यापार सुरू केले जातील, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे व जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्यापाऱ्यांची मागणी योग्य असल्याचे प्रतिपादन केले असल्याचे गांधी यांनी नमूद केले.