कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी १२ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आहेत. जिल्ह्यात एकूण ८८० सकारात्मक पैकी ७२६ जणांना बरे झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे.

आज १२६ प्राप्त अहवालांपैकी १०२ नकारात्मक, तर आज तर १२ अहवाल प्रलंबित आहेत. १२ सकारात्मक अहवालांपैकी गडहिंग्लज-३ , हातकणंगले-१, शिरोळ-१,  नगरपरिषद क्षेत्र-६ व इतर जिल्हा-१ असा समावेश आहे. आजअखेर  एकूण १४२ सकारात्मक रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी—पाटील यांनी आज दिली. क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आजरा-८१, भुदरगड-७६, चंदगड-९४, गडहिंग्लज-१०५, गगनबावडा-७ , हातकणंगले-१६, कागल-५७, करवीर-२६, पन्हाळा-२९, राधानगरी-६९, शाहूवाडी-१८६, शिरोळ-१०, नगरपरिषद क्षेत्र-५९, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-४७ आणि पुणे-२, सोलापूर-३, सातारा-२ , मुंबई-२ , नाशिक-१, कर्नाटक-७, आणि आंध्रप्रदेश-१ असे इतर जिल्हा व राज्यातून आलेले १८ असे मिळून एकूण ८८० रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. १२ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल रुग्णांची संख्या १४२ आहे.