कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथकाने  बुधवारी  हेर्ले (ता. हातकणंगले ) येथे पथकाने सापळा रचून मोटार अडवली. त्यातून २ लाख रुपयांचे मद्य व कार असा ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चेतन विनायक साटेलकर (वय २४, रा.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) व अजय सूर्यकांत कवठणकर (वय २०, रा. ओटवणे, ता. सावंतवाडी) यांना अटक केली आहे.

विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी कोल्हापूर विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार व अधीक्षक गणेश पाटील यांनी सर्व भरारी पथकांना गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे गोवा व कर्नाटकाच्या सीमेवर तपासणी पथके नेमली आहेत. कोल्हापूर-सांगली रस्त्यावर हेर्ले गावाच्या हद्दीत एक मोटार थांबवून त्यांची झडती घेतली.

यामध्ये २ लाख ६४० रुपयांचे गोवा बनावटीचे ७५०मिलीचे २५ बॉक्स सापडले. मोटारसह मद्य असा ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर बेकायदेशीरपणे मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली.