विश्व हिंदू परिषद कोल्हापूरच्यावतीने मंगळवार पेठ येथील जिल्हा कार्यालयात नद्यांचे जल आणि माती असलेल्या दोन मंगल कलशांचे पूजन करुन ते राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभासाठी अयोध्येला पाठवण्यात आले.

यातील एका मंगल कलशामध्ये जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा, कुंभी, कासारी, हिरण्यकेशी या नद्यांचे पाणी तर दुसऱ्या कलशात कोल्हापूर नगरी, कोडोली, पन्हाळा, राधानगरी, करवीर तालुक्यातील काही गावे, गगनबावडा, इत्यादी ठिकाणची माती समाविष्ट आहे.

कलशांना कुंकुमार्चन करुन फुले वाहून ओवाळण्यात आले. त्यानंतर श्रीरामाच्या नावाचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर हे कलश अयोध्येकडे राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पाठवण्यात आले. फिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळून हा सर्व कार्यक्रम करण्यात आला.