विवाहित स्त्रीच्या वेदनेची परिसीमा ठरणारी ‘सतीची परंपरा’ समाजसुधारकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बंद झाली . त्यावर आधारित प्रहसनात्मक सुखांतिका असलेली ‘कस्तुरा’ ही एकांकिका ‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम स्पर्धेसाठी कोल्हापूर केंद्रातून निवडली गेली. राजारामबापू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर या महाविद्यालयाने सादर केलेल्या या एकांकिकेस विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.

कोल्हापूरच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार महाविद्यालयाच्या ‘द गिफ्ट’ ने दुसरा तर सांगलीच्या राजमती नेमगोंडा पाटील महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘मर्सिया’ या एकांकिकेने तिसरा क्रमांक मिळवला. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर आणि संगीत नाटकाचे ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते श्रीकृष्ण लाटकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. नाटय़ अभ्यासक, ज्येष्ठ रंगकर्मी अनंत कान्हो आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रतिभा दाते यांनी विभागीय अंतिम स्पर्धेचे परीक्षण केले. वितरण विभागाचे मुख्य व्यवस्थापक मिलिंद प्रभुघाटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

ज्येष्ठ रंगकर्मी अनंत कान्हो यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘महानगरांपेक्षा ग्रामीण भागातून उत्तम विषय निवडले जात आहेत. त्यांच्या जगण्यातील विषय प्रभावीपणे मांडले जात आहेत. याचे स्वागत केले पाहिजे, पण याचवेळी सुंदर प्रयोग करताना सादरीकरणावेळी तांत्रिक बाबींकडे कलाकारांनी काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. अभिनय उत्तम वठत असताना आवाजाची पातळी नाहक वाढणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शब्दोच्चार अधिक सुस्पष्ट आणि हळुवार असला पाहिजे.’

अंतिम फेरीतील अन्य विजेते – सर्वोत्कृष्ट  दिग्दर्शक – स्वप्नील माने (कस्तुरा), सर्वोत्कृष्ट लेखक – सुशांत घाडगे (कस्तुरा) , सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष )  – इंद्रनील कामत (द गिफ्ट – भूमिका शुभंकर), सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री) – प्रणाली अंबेकर (कस्तुरा – भूमिका कस्तुरा), सर्वोत्कृष्ट  नेपथ्यकार – शुभम लठ्ठे (द गिफ्ट) , सर्वोत्कृष्ट संगीत – यशश्री गुळवणी (द गिफ्ट), सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना – अभिषेक विभुते (द गिफ्ट).

१३ कोल लोकांकिका- कोल्हापूर केंद्रातून महाअंतिम स्पर्धेसाठी निवडल्या  गेलेल्या कस्तुराह्ण एकांकिकेतील विजेत्या संघाला चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, संगीत नाटकाचे ज्येष्ठ दिग्दर्शक श्रीकृष्ण लाटकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. सोबत वितरण विभागाचे मुख्य व्यवस्थापक मिलिंद प्रभुघाटे.

उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर आणि संगीत नाटकाचे ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते श्रीकृष्ण लाटकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. नाटय़ अभ्यासक, ज्येष्ठ रंगकर्मी अनंत कान्हो आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रतिभा दाते यांनी विभागीय अंतिम स्पर्धेचे परीक्षण केले. वितरण विभागाचे मुख्य व्यवस्थापक मिलिंद प्रभुघाटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

ज्येष्ठ रंगकर्मी अनंत कान्हो यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘महानगरांपेक्षा ग्रामीण भागातून उत्तम विषय निवडले जात आहेत. त्यांच्या जगण्यातील विषय प्रभावीपणे मांडले जात आहेत. याचे स्वागत केले पाहिजे, पण याचवेळी सुंदर प्रयोग करताना सादरीकरणावेळी तांत्रिक बाबींकडे कलाकारांनी काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. अभिनय उत्तम वठत असताना आवाजाची पातळी नाहक वाढणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शब्दोच्चार अधिक सुस्पष्ट आणि हळुवार असला पाहिजे.’

प्रायोजक

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून, ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.

सविस्तर निकाल

सर्वोत्कृष्ट  दिग्दर्शक – स्वप्नील माने (कस्तुरा), सर्वोत्कृष्ट लेखक – सुशांत घाडगे (कस्तुरा) , सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष )  – इंद्रनील कामत (द गिफ्ट – भूमिका शुभंकर), सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री) – प्रणाली अंबेकर (कस्तुरा – भूमिका कस्तुरा), सर्वोत्कृष्ट  नेपथ्यकार – शुभम लठ्ठे (द गिफ्ट) , सर्वोत्कृष्ट संगीत – यशश्री गुळवणी (द गिफ्ट), सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना – अभिषेक विभुते (द गिफ्ट).