23 September 2020

News Flash

कोल्हापूर महापालिकेत मुश्रीफ यांचे जोरदार स्वागत

हसन मुश्रीफ यांचे सोमवारी पहिल्यांदाच महापालिकेत आगमन होत असताना जोरदार स्वागत करण्यात आले.

हसन मुश्रिफ (संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर : सत्तेला धक्का बसण्याची वेळ आली असताना संयत खेळी करून सत्ता टिकवणारे  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांचे सोमवारी पहिल्यांदाच महापालिकेत आगमन होत असताना जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीच्या उत्साही नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मुश्रीफ यांना खांद्यवरून उचलून चौकात आणले.

महापौर प्रवेशापेक्षा मुश्रीफ, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या पत्नी प्रतिमा पाटील यांची उपस्थिती चर्चेचा विषय बनली. कोल्हापूर महापालिकेच्या सत्तांतराच्या हालचालीमुळे निर्माण झालेल्या टोकाच्या राजकीय ईर्षेत राष्ट्रवादीने बाजी मारली. आज महापौर सरीत मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी कार्यालय प्रवेश केला.

अटीतटीच्या लढतीचा तणावाचे विजयात रूपांतर झाल्याचा आनंद राष्ट्रवादीच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांत स्पष्ट दिसत होता. आमदार मुश्रीफ यांना खांद्यावरून महापालिकेत आणत नगरसेवकांनी लढतीचा आनंद व्यक्त केला. शिवसेनेची चार मते तटस्थ ठेवत काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणूक बहाल करणारे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना कार्यालय प्रवेशासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. महापौर मोरे यांनी कार्यालय प्रवेश करताच फटाक्यांची जोरदार आतषबाजी कार्यकर्त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 3:41 am

Web Title: mla hasan mushrif warmed welcome in the kolhapur corporation
Next Stories
1 कोल्हापूर जिल्ह्यतील २०१ गावांमध्ये दुष्काळ घोषित
2 कोल्हापूरमधील राजकारणाला नवे वळण
3 कोल्हापूर विभागातून ‘कस्तुरा’महाअंतिम फेरीत
Just Now!
X