ज्येष्ठ नेते गोिवदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासाचा एसआयटी प्रमुख संजयकुमार यांनी येथे आढावा घेतला. सुमारे दोन तास झालेल्या बठकीत संजयकुमार यांनी तपासाबाबत महत्त्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या दुसरा संशयित वीरेंद्रसिंह तावडे याच्यावर दाखल करण्यात येणाऱ्या आरोपपत्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून १ डिसेंबरपूर्वी चार्जशिट दाखल करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी २ रोजी सप्टेंबर एसआयटीने तावडे (वय ४८, रा. पनवेल जि. रायगड) याला अटक केली होती. यानंतर तावडेच्या पुणे येथील घरावर तसेच सनातनच्या पनवेल येथील आश्रमावर एसआयटीने छापे टाकले होते. या छाप्यादरम्यान पोलिसांनी महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. तसेच तावडेच्या मालकीची ट्रॅक्स एसआयटीने अकोला येथून जप्त केली होती.

एसआयटी प्रमुख संजयकुमार यांनी तपासी अधिकारी सोहेल शर्मा यांच्यासह अधिकाऱ्यांची बठक घेतली. पानसरे हत्येप्रकरणाचा संपूर्ण आढावा एसआयटी प्रमुखांनी बठकीदरम्यान घेतला. अत्यंत गोपनय पद्धतीने पार पडलेल्या या बठकीत तपासाबाबत महत्त्वाच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

१ डिसेंबरपूर्वी तावडे याच्या विरोधात चार्जशिट दाखल करू, असे एसआयटीने उच्च न्यायालयात ऑक्टोबरमध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान सांगितले होते. यानंतर तावडेवरील चार्जशिट तयार करण्याच्या कामास गती आली होती. याबाबतचा आढावा संजयकुमार यांनी घेतला. तसेच चार्जशिटमध्ये कोणत्याही उणीवा राहू नयेत याबाबत सूचनाही केल्या. चार्जशिटचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे बठकीतील एका विश्वसनीय सूत्राने सांगितले.