कोल्हापूर : कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर निवडीनंतर त्यांचे गुरुवारी कोल्हापूर शहरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेना शहर कार्यकारणी, शिवसैनिक, नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

आमदार क्षीरसागर हे मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. ही संधी हुकली तरी राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर ते पावसाळी अधिवेशनानिमित्त मुंबईत होते. आज दुपारी येथे त्यांचे आगमन झाल्यावर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने औक्षण करून स्वागत केले. कावळा नाका येथे महापौर सरिता मोरे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, शिवसेना गटनेते नियाज खान, नगरसेवक राहुल चव्हाण, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी शिवसैनिकांनी क्षीरसागर यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर कावळा नाका येथून सुरू झालेली दुचाकी रॅली शिवसेना शहर कार्यालयापर्यंत काढण्यात आली. रॅली मार्गावर शिवसेनेचे विभाग व शाखांच्या वतीने त्यांचे  स्वागत करण्यात आले. रॅलीनंतर आमदार क्षीरसागर यांनी पत्नी, देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागरसह यांच्यासह सहकुटुंब महालक्ष्मी आणि आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.