News Flash

शिवसेनेचे माथेरानमधील १० नगरसेवक भाजपमध्ये

भाजपचा कोकणात झपाट्याने विस्तार होत आहे.

कोल्हापूर : रायगड जिल्ह्यातील गिरिस्थान नगर परिषद असलेल्या माथेरानमधील १० शिवसेना नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी भाजपत प्रवेश केला. येथील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

भाजपचा कोकणात झपाट्याने विस्तार होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे बळ वाढले आहे. आगामी निवडणुकीत त्याचा प्रत्यय दिसेल, असा दावा पाटील यांनी केला. आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, भाजपची संघटनात्मक पद्धत, लोकांना मिळणारा सन्मान लक्षात घेऊन या नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माथेरान येथे पुढील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा प्रवेश होणार आहे. उपनगराध्यक्ष आकाश कन्हैया चौधरी यांच्यासह १० नगरसेवक, शहर संघटक प्रवीण सकपाळ यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी हाती कमळ घेतले. भाजप कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2021 1:08 am

Web Title: shiv sena corporator bjp akp 94
Next Stories
1 आशानिराशेच्या हिंदोळ्यांवर वस्त्रोद्योग
2 शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी कोल्हापुरात निदर्शने
3 कोल्हापूरची रुग्णसंख्या लाखावर; मृत्युदर रोखण्याचे आव्हान
Just Now!
X