यंदा शुक्राचा अस्त असल्याने सुटीच्या कालावधीत म्हणजे मे-जूनमध्ये लग्नाचे मुहूर्त नाहीत. यामुळे यंदाच्या हंगामात तब्बल ७४ मुहूर्त असले तरी व्यवसाय आणि नोकरी यांची सांगड घालीत मुहूर्त निश्चित करण्यापूर्वी मंगल कार्यालये आगावु नोंदणी करण्यासाठी वधूवरांच्या पालकांची आतापासूनच धांदल उडाली आहे.
काíतक बारस हा तुलसी विवाहाचा मुहूर्त पार पडल्यानंतर यंदाच्या लग्नाच्या हंगामासाठी तयारी सुरू झाली आहे. लग्नासाठी मुलांच्या परीक्षा आटोपल्यानंतर विशेषता एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यातील लग्न तिथी निश्चित करण्यावर भर देण्यात येतो. उन्हाळी सुटी असल्यामुळे नातेवाइकांनाही सोयीस्कर ठरत असते. गेल्या हंगामात सिंहस्थ कुंभमेळा असल्याने अनेकांचे विवाह लांबणीवर टाकण्यात आले होते. या लांबणीवर पडलेल्या लग्नांसाठी आता मुहूर्त काढण्यात येत असून मुहुर्त साधण्यासाठी लगीनघाई सुरू आहे.
यंदाच्या हंगामात तब्बल ७४ मुहूर्त पंचागामध्ये आहेत. यापकी ४४ मुहूर्त हे गोरज मुहूर्त आहेत. डिसेंबर व फेबुवारी या दोन महिन्यात सर्वाधिक मुहूर्त असून ते १४ आहेत. वैशाख आणि ज्येष्ठ हे दोन महिने उन्हाळी सुटीच्या कालावधीत असल्याने या महिन्यातील मुहूर्तावर लग्न पार पाडण्यास पालकांची प्रथम पसंती असते. मात्र यंदा शुक्राचा अस्त या महिन्यात असल्याने पंचागांमध्ये या महिन्यात मुहूर्त नाहीत. केवळ १ मे या दिवशी मुहूर्त असून त्यानंतर जुल महिन्यातील ७ तारखेलाच मुहूर्त आहे.