पंचगंगेच्या पातळीत वाढ , शेतकरी वर्ग आनंदला

कोल्हापूर : गेल्या पंधरवडय़ापासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी कोल्हापूर शहरात हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊ स पडला आहे. वातावरणात पुन्हा गारठा झाल्याने उकडय़ाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, तर पावसाच्या दमदार आगमनाने शेतकरी वर्ग आनंदला आहे. येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत २४ तासात एक फु टाने वाढ झाली असल्याची माहिती आपत्ती निवारण कक्षातून शुR वारी सायंकाळी देण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली तरी मध्यंतरी पंधरवडाभर जोमदार पाऊ स पडला. पाणी टंचाईची स्थिती दूर झाली, शेती कामांना गती आली. मात्र, गेले पंधरा दिवस पावसाचे दर्शन दुर्मीळ झाले. कधीतरी हलक्या सरी बरसत होत्या. त्यात फारसा दम नसल्याने चिंता निर्माण झाली होती. गेल्या आठवडय़ात तर उकाडा वाढला होता. शेतकरीही चिंतेत होता.

काल रात्रीपासूनच पावसाने पुन्हा बरसण्यास सुरवात केली. शुक्रवारी सकाळपासूनच जोरदार पाऊ स पडत राहिला. दुपारनंतर  मुसळधार पाऊ स झाला. संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. राजारामपुरी, शाहूपुरी या व्यापारी पेठेच्या भागात पाणी साचल्याने त्यातून मार्ग काढताना पादचारी, वाहनधारक यांना कसरत करावी लागली. शहरासह जिल्ह्या च्या विविध भागात जोरदार हजेरी लावली . पश्चिमेकडील पाणलोट भागात दमदार पाऊ स पडला. यामुळे नदी, धरणातील पाणीसाठा  वाढत आहे. काल  सायंकाळी पंचगंगा नदीवरील येथील राजाराम बंधारम्य़ाची पाणी पातळी १७ फू ट होती. गेले काही दिवस घटत चाललेली पाणी पातळी पुन्हा वाढत आहे. आज सायंकाळी सहा वाजता पाणीपातळी १८ फू ट इतकी नोंदली गेली होती.