भारतीय रेल्वे आíथक व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष पुरवले आहे. खर्च कमी करून अधिक उत्पन्न वाढवण्यावर भर दिला आहे. रेल्वेमध्ये वीज बचत, ऊर्जेसाठी अपारंपरिक स्रोतांचा वापर यांसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना सुरुवात केली जाणार असल्याने येत्या १० वर्षांत १ हजार मॅगावेट विजेची निर्मिती होऊन ४१ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असे प्रतिपादन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे केले.

रेल्वे मंत्री प्रभू हे आज करवीरनगरीच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते रेल्वेच्या विविध प्रकल्पांची सुरुवात, लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी रेल्वेच्या सुसाट कार्यक्रमाचा गतिमान आढावा घेतला.

भारतीय रेल्वे कात टाकून कशाप्रकारे सेवारत झाली आहे याविषयी भाष्य करताना प्रभू म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी रेल्वे ही अत्यावश्यक सेवा असल्याने त्याच्या विविध प्रकल्पांसाठी ८ लाख ५६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. देशात महत्त्वाचे स्थान असलेल्या महाराष्ट्राकडे विशेष लक्ष पुरवले अरेल्वे मंत्री प्रभू हे आज करवीरनगरीच्या दौऱ्यावर सून तब्बल १ लाख ३६ हजार कोटी रुपये रेल्वे विकासासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रेल्वेने आíथक बेशिस्तीचे दिवस पाहिले आहेत. निधी नाही म्हणून गुंतवणूक नाही आणि गुंतवणूक नसल्याने उत्पन्न नाही. अशा दुष्टचक्रामध्ये रेल्वे सापडली होती, असा उल्लेख करून प्रभू म्हणाले या बिकट स्थितीतून रेल्वेला बाहेर काढण्याचा संकल्प मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने केला आहे. केवळ अर्थसंकल्पावर अवलंबून न राहता एलआयसीमधून दीड लाख कोटी रुपये निधी उभा करण्यात आला आहे. त्यातून विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लावले जात आहे. मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ७६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. देशातील ४०० रेल्वेस्थानकांचा विकास करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी ७,१६९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच त्याचीही पायाभरणी करून कामाला सुरुवात करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.खासदार संभाजी राजे, खासदार धनंजय महाडीक, खासदार राजू शेट्टी व खासदार प्रकाश हुक्केरी (कर्नाटक) यांनी रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षा रेल्वे मंत्र्यांना थोडक्यात कथन केल्या.