लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापुर मधील पुरस्थिती वेळी मागील २ ते ३ वर्षांमध्ये आम्ही १०० कोटींपेक्षा जास्त नुकसान भरपाईचे दावे ग्राहकांना दिले आहेत, असे मत बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीचे कार्यकारी संचालक तपन सिंघल यांनी येथे व्यक्त केले. दाव्यांची त्वरित प्रतिपूर्ती करण्याद्वारे आमची विश्वसनीयता सिद्ध केली आहे, असा दावाही त्यांनी केला.

कोल्हापुरातील कंपनीच्या सुसज्ज प्रादेशिक कार्यालयाच्या लोकार्पण निमित्त सिंघल यांनी कोल्हापूर व नजीकच्या क्षेत्रातील भागीदारांशी संवाद साधला. कोल्हापुरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, वरिष्ठ अध्यक्ष के.व्ही.दीपू यांनी ‘सर्वत्र विमा’ व्हॅनला हिरवा झेंडा दाखविला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-गुणरत्न सदावर्तेना २५ हजार सभासद रामराम करणार; कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार

सिंघल म्हणाले, आमची संस्था देशभरातील १४ टीपेक्षा जास्त ग्राहकांसाठी विश्वसनीय भागीदार म्हणून निर्माण झाली आहे. प्रत्येक व्यक्तीला विमा कक्षेत आणण्याच्या आमचा प्रयत्न आहे. नवीन कार्यालमुळे आकस्मिक परिस्थितीत कोल्हापूर मधील कोणीही आर्थिक अडचणीत अडकणार नाही याची काळजी घेत आहोत. हे कार्यालय कोल्हापूर प्रदेशाच्या आर्थिक परिवर्तनाच्या प्रवासाचा मानबिंदू ठरेल.