कोल्हापूर : जोतिबा घाटात दानेवाडी (ता.पन्हाळा) येथे विटा येथून शालेय सहल घेऊन आलेल्या एसटी बसचा ब्रेकफेल होऊन झालेल्या अपघातात १४ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारस हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

विटा (ता. खानापूर) येथील इंदिराबाई  भिडे कन्या प्रशालेची वार्षिक  शैक्षणिक सहल जोतिबा, पन्हाळा व कणेरी मठ आयोजित केली होती. सकाळी जोतिबा येथे देवदर्शन घेऊन  पन्हाळा पर्यटनसाठी निघाले होते.  जोतिबावरून  पन्हाळ्याकडे जात असताना घाटातील दानेवाडी शेजारील मोठय़ा उतारावरती बसचा ब्रक निकामी झाला, चालकाने प्रसंगावधान राखून. बस रस्ताकडील चरीत घातली.

त्यामुळे खोल दरीत जाणारी गाडी चरीत पलटी झाली. गाडी  उलटल्याने गाडीतील विध्यार्थी एकमेकांच्या अंगावर पडल्यामुळे  किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले.

यामध्ये दोन शिक्षक व १२ विद्यार्थी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच तासगावच्या आमदार सुमनताई पाटील यांनी सीपीआरमध्ये  जखमींची विचापुस करून, त्यांना प्रत्येकी १ हजारांची रोख मदत केली. या अपघाताची नोंद कोडोली (ता .पन्हाळा) पोलिस ठाण्यात झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमींमध्ये निमीशा विजय साळुंखे (मादळमुटी), अंजली निवास कांबळे( विटा सावरकर), पूजा किसन जगताप (भाग्यनगर), गौरी चंद्रकांत पाटील(विटा), तन्मय तुकाराम साठे (विटा), पायल प्रमोद खांडेकर( विटा), इंदीरा तुकाराम यादव (नागेवाडी ), सृष्टी सनिल जाधव ((कार्वे), प्रीती संभाजी मोरे ( आम्रापूर), ज्योती सतीश सपकाट (विटा), ऋतुजा शशिकांत जाधव(कार्वे) हे जखमी २४ ते १६ वयोगटातील आहेत . तसेच गोविंद मधुकर धर्मे (वय ३६, देशींग), स्वागत धर्मराज कांबळे (वय २८, कागल), कविता वेभव कुपार्डे (वय ३७, विटा) यांचाही जखमींमध्ये समावेश आहे.