कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील दोन हजार दिवे बंद असल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने कंदील मोर्चा काढून अनोखे आंदोलन करण्यात आले. हे दिवे त्वरित बसवण्यात यावेत अशी मागणी आप ने केली. महानगरपालिकेने २०१९ मध्ये शहरातील ३१२४१ पथदिवे बसवण्याचा ठेका केंद्र सरकारच्या ईईएसएल कंपनीला दिला गेला. या दिव्यांच्या बिलापोटी पुढील सात वर्षांसाठी दरमहा ३१ लाख ५४ हजार ७५७ इतकी रक्कम महापालिकेने ईईएसला द्यावे लागतात. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे एक कोटी ८९ लाख रुपये थकीत आहेत. ही रक्कम थकीत असल्याने कंपनीने दुरुस्ती व देखभालीचे करण्यास नकार दिला आहे. यामुळे शहरातील सुमारे दोन हजार बंद अवस्थेत आहेत.

हेही वाचा >>> कोल्हापूर: शेतजमीनीच्या वादातुन झालेल्या मारहाण आणी गोळीबार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Beer companies face dry day due to water shortage
पाणीटंचाईमुळे बिअर कंपन्यांवर ‘ड्राय डे’चे सावट
Panvel, Violent Clash, Erupts, between two groups, Police Attacked, near karanjade colony, fir register, against 18, crime news,
पनवेल : रंगपंचमीत दोन गटातील हाणामारीत पोलिसांना धक्काबुक्की
Solapur, Moneylender, Hires Hitmen, firing on Businessman, Recover Overdue Loan, crime news, marathi news, police,
सोलापूर : कर्जवसुलीसाठी व्यापाऱ्यावर गोळीबार; सावकाराने सुपारी देऊन केला खुनीहल्ला

कंपनीने काम बंद केल्यामुळे नागरिकांना अनेक ठिकाणी अंधाराचा सामाना करावा लागत आहे. ज्या ठिकाणी नवीन पोल बसवलेले आहेत त्याठिकाणी देखील दिवे नाहीत. “महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात अंधार पसरला आहे. यामुळे चोरी, लूटमार होण्याच्या प्रकारामध्ये वाढ होत आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेला जागे करण्यासाठी हा कंदील मोर्चा काढला” असल्याचे आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ‘ब्रेकिंग न्युज’ लवकरच; श्रीमंत शाहू महाराज यांचे उमेदवारी मिळण्याचे संकेत

यानंतर शिष्टमंडळाची महापालिका अधिकाऱ्यांसोबत स्टँडिंग कमिटी हॉलमध्ये बैठक पार पडली. येत्या १० मार्च पर्यंत सर्व दिवे दुरुस्त करून सुरु करू असे आश्वासन शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी दिले. दिवे सुरु केले नाहीत तर महापालिका चौकात पणत्या लावू असा इशारा देसाई यांनी दिला. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सुरज सुर्वे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, आदम शेख, स्मिता चौगुले, इस्थेर कांबळे, उषा वडर, समीर लतीफ, मयूर भोसले, अमरसिंह दळवी, उमेश वडर, राकेश खांडके, आनंदराव चौगुले, राकेश गायकवाड, जयश्री पाटील, सुनीता मोहिते, नाझील शेख, सरिता पोवार, हेमलता पोवार, अश्विनी साळोखे, शशिकला रायकर, वैशाली सोनावणे, सुरेखा सोनावणे, विजया साळोखे, जयसिंग चौगुले, रणजित बुचडे आदी उपस्थित होते.