यावर्षीचा भाई माधवराव बागल पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती भाई माधवराव बागल विद्यापीठाचे अध्यक्ष वकील अशोकराव साळोखे, कार्याध्यक्ष प्राचार्य टी. एस. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. २८ मे रोजी येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते होणार आहे. होणार आहे. रोख पाच हजार रुपये, शाल, फेटा, गौरवपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. परिवर्तनवादी चळवळ, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल बागल विद्यापीठातर्फे १९९२ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. वसंत भोसले यांच निर्भीड पत्रकार-संपादक म्हणून त्यांची ओळख आहे. पत्रकारितेतील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. असे प्राचार्य पाटील यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2023 रोजी प्रकाशित
कोल्हापूर: भाई माधवराव बागल पुरस्कार वसंत भोसले यांना जाहीर
पत्रकारितेतील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. असे प्राचार्य पाटील यांनी सांगितले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-05-2023 at 21:17 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bagal purskar 2023 announced to vasant bhosale zws