कोल्हापूर : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून भाजपाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे गुरुवारी सांगण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निवडणुकीसाठी हा त्यांचा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.

लोकसभा मतदार संघात त्यांच्या दौऱ्याची तयारी करण्यात आली आहे. भाजपा जिल्हा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली प्रमुखांची बैठक झाली. त्या बैठकीत चौहान यांचा दौरा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.

हेही वाचा : केंद्र सरकारची उसाच्या एफआरपीची वाढ तोकडी; राजू शेट्टी यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दौरा याप्रमाणे

सकाळी ९ वाजता – महालक्ष्मी मंदिर दर्शन, बिंदू चौक येथे ‘चाय पे चर्चा’ संवाद, महाराणा प्रताप चौक याठिकाणी दिवार लेखन (कमळ चिन्ह रेखाटन),पत्रकार परिषद, महासैनिक दरबार हॉल येथे कोल्हापूर लोकसभा मतदार संघाच्या मेळाव्यास मार्गदर्शन, शिरोली येथे हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या मेळाव्यास मार्गदर्शन, दुपारी ३.३० वाजता साताऱ्याकडे रवाना.