गुंतवणूक केलेली २१ लाख ६६ हजार रुपयांची रक्कम कंपनीकडे न भरता स्वतःकडे ठेवून फसवणूक केल्याप्रकरणी एल अँड टी फायनान्स सर्व्हिसेस या कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सचिन बाळासाहेब साबळे ( ४१, रा.असू ता. फलटण) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ औरंगाबाद भाजपा कार्यालयासमोर घोषणाबाजी; तिघांना अटक

एल अँड टी फायनान्स सर्व्हिसेस ही कंपनी गृहकर्ज, वाहन यासाठी कर्जपुरवठा करते. कंपनीचे कार्यालय येथील पाच बंगला भागात आहे. एरिया कलेक्शन मॅनेजर अभिजीत राजगोंडा पाटील ( ३७, रा. माधवनगर सांगली) व कलेक्शन ऑफिसर ज्ञानेश्वर अंकुश सावंत ( २७,रा. निगडी ता. जत) यांनी कंपनीच्या कर्जदारांकडून गतवर्षी ५ महिन्याच्या कालावधीत एकूण २१ लाख ६६ हजार रुपये इतकी रक्कम स्वीकारली अथवा गोळा केली. पण ती कंपनीच्या खात्यामध्ये जमा न करता कंपनीची फसवणूक केली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against 2 people for cheating investors dpj
First published on: 09-06-2022 at 19:47 IST