कोल्हापूर : हातकणंगले, चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत दोन्ही ठिकाणी  महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष विजयी झाले. त्यांनी दोन्ही पालिकेत यशाचा  झेंडा रोवला. भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हातकणंगले नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अरुणकुमार जानवेकर  ४४४ मतानी विजयी झाले. तर १७ नगरसेवकपदाच्या निवडणुकी सर्वाधिक ७ जागी शिवसेना, ५ जागा भाजपाला, काँग्रेस-१ आणि राष्ट्रवादी-१ जागी तर अपक्षाना-३ ठिकाणी विजय मिळाला. राज्य सरकारप्रमाणे हातकणंगलेमध्येही शिवसेना, काँग्रेस -राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे.

पहिला नगराध्यक्ष कोण याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.  काँग्रेसचे अरुणकुमार जानवेकर  शेवटच्या १७ प्रभागापर्यन्त काँग्रेसचे आघाडीवर राहिले. अखेर ४४४ मतानी त्यांनी विजय मिळवला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार निहाय मतदान काँग्रेसचे अरुणकुमार जानवेकर -२९२२, भाजपाचे विजय चौगुले – २४७८, शिवसेनेचे प्रकाश कांबळे – १८७३, ताराराणी आघाडीचे अपक्ष संदीप कांबळे-११६३, मनसेचे उत्तम पांडव – १६५.

चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत  महाविकास आघाडीच्या उमेदवार प्राची दयानंद काणेकर(राष्ट्रवादी)यांनी विजय मिळवला. तसेच आघाडीला दहा जागा मिळाल्या.

अत्यंत चुरशीत झालेल्या या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र येऊन राज्यातील महाविकास आघाडीच्याच धर्तीवर नगरपंचायतसाठी आघाडी निर्माण केली होती. आणि या आघाडीलाच चंदगड शहरवासीयांनी स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे १)प्राची दयानंद काणेकर (नगराध्यक्ष-राष्ट्रवादी), २)झाकीरहुसेन युसुफ नाईक (शिवसेना),३)नेत्रदिपा प्रमोद कांबळे (शिवसेना), ४)अनुसया श्रीकृ ष्ण दाणी (काँग्रेस), ५) संजिवनी संजय चंदगडकर (राष्ट्रवादी), ६)माधुरी मारुती कुंभार (शिवसेना),७)रोहित राजेंद्र वाटंगी (राष्ट्रवादी), ८)फिरोज अब्दुलरशिद मुल्ला(शिवसेना), ९)अभिजित शांताराम गुरबे (काँग्रेस), १०) अनिता संतोष परीट (जनसुराज्य). सर्व महाविकास आघाडी.

भाजपचे उमेदवार निवडून आलेले दिलीप  महादेव चंदगडकर, नुरजहाँ अब्दलरहीम नाईकवाडी, प्रभा सचिन निंगाप्पा नेसरीकर,प्रमिला परशराम गावडे, संजना संदीप कोकरेकर,  आनंदा  मारुती हळदणकर (अप्पी पाटील गट),  मुमताजबी मदार मेहताब नाईक (दोघेही अपक्ष).

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandgad and hatkanangale nagar panchayat maha vikas aghadi zws
First published on: 31-12-2019 at 00:29 IST