कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील निधी वाटपाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सत्ताधारी गटाकडून विरोधकांना निधी देताना तुझा भाव केला जात आहे सत्ताधारी आमदार खासदारांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन विषय संपला जात आहे या प्रकारावर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांनी रविवारी तीव्र नाराजीचे दर्शन घडवले.

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सहा आमदारांना केवळ दहा टक्के निधी देणे हे जनतेच्या विरोधातील धोरण आहे. महाराष्ट्रातील सत्तारूढ सरकारने राज्यभरातील जिल्हा नियोजन समित्यांचे नाव बदलून आता ‘सत्तारूढ निधी वितरण समिती’ असे नाव ठेवावे, अशा शब्दात विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.

Satej Patil, Sanjay Mandalik,
उपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना जागा दाखवा; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
ajit pawar ncp s mla, dilip mohite, collector office, amol kolhe, nomination form, shirur lok sabha constituency, lok sabha 2024, election 2024, shirur news, politics news, pune news,
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या ‘टायमिंग’मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
High Court Stays Caste Certificate Verification Committees Decision to Cancel Rashmi Barves Caste Validity Certificate
रश्मी बर्वे यांना दिलासा! जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती, मात्र…

आणखी वाचा-थुंकीमुक्त शहर नववर्षाचा संकल्प; कोल्हापूरकर उतरले रस्त्यावर

जिल्हा नियोजनामध्ये वाद उफाळणार

सत्ताधारी म्हणून ५-१० टक्के निधी जादा घेणे समजू शकतो. परंतु सहा आमदारांना फक्त १० टक्के निधी हे केवळ आणि केवळ दुर्दैवी आहे. याबाबत पालकमंत्र्यांना सर्व काँग्रेस आमदारांच्या वतीने पत्र देण्यात आल आहे. तसेच आठ जानेवारीला होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.