कोल्हापूर :  करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. गुरुवारी मंदिर, शिखर व परिसराची स्वच्छता करण्यात आली. पुढील टप्प्यात अलंकाराची स्वच्छता केली जाणार आहे. गणेशउत्सव वाजत गाजत संपल्यानंतर आता कोल्हापूरला नवरात्रीचे वेध लागले आहेत. महालक्ष्मी मंदिरात तयारी गतीने सुरु झाली आहे. स्वच्छतेचे काम आजपासून सुरु करण्यात आले.

हेही वाचा >>> भाजप प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या कार्यकर्त्यांकडून बंडाचे निशाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोफत स्वच्छता अभियान आय स्मार्ट फॅसिटिक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्यामार्फत दरवर्षी प्रमाणे श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिररात मोफत स्वच्छता अभियान राबवले जाते. मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते स्वच्छता सामग्रीची पूजन करून या कामाला  प्रारंभ करण्यात आला . यावेळी आय स्मार्टचे संजय माने, देवस्थानचे स्वच्छता कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. आज मंदिराची बाहेरील तसेच शिखरांची स्वच्छता करण्यात आली.