मुसळधार पावसाने दैना उडवल्यानंतर पुराचे पाणी ओसरेल तसे कीटकजन्य व जलजन्य रोग पसरण्याची शक्यता आहे. सध्या शहरात डेंगू सदृश १०, जुलाब – उलटीचे काही रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अरुण वाडेकर यांनी सांगितले. यामुळे कोणताही धोका उद्भवू नये यासाठी या स्थितीवर नियंत्रण करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या आठवडय़ातील मुसळधार पावसामुळे अनेक नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. महापुराचा धोका संपला असला तरी पाणी ओसरेल तसे डेंग्यू, मलेरिया व इतर कीटकजन्य व जलजन्य रोग उद्भवण्याची चिन्हे आहेत. ही बाब लक्षात घेऊन आज प्रशासनाने पंचगंगा घाट, सुतार माळ, व्हीनस कॉर्नर परिसर आदी भागात अग्निशमन दलाच्या वाहनातील फायिरग फोर्सचा वापर केला. पाण्याचा जोरदार मारा करून पुरामुळे साचलेला गाळ समूळ धुऊा काढला.  पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया व इतर कीटकजन्य व जलजन्य रोग उचल खातात. त्याची बाधा होऊ नये यासाठी महानगरपालिका जनजागृती मोहीम राबविणार  आहे. महानगरपालिका व एन.एस.एस. विद्यार्थी यांचेकडून प्रत्येकी २०० सदस्य २० ते २२  जुल या कालावधीत महानगरपालिका कार्यक्षेत्रात कीटकजन्य व जलजन्य रोगांवर नियंत्रण करण्यासाठी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेअंतर्गत या आजाराबाबत प्रबोधन, मार्गदर्शन, तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे. घरी येणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यास योग्य ती माहिती देऊन सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्याधिकारी यांनी केले आहे. या मोहिमे अंतर्गत रोगांवर नियंत्रण कसे ठेवावे याबाबत माहिती पत्रकांचे वाटप करणेत येणार आहे.