scorecardresearch

आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आणखी २५ शेतकऱ्यांची तक्रार

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासद व शेअर्स प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी फसवणूक केली असल्याची तक्रार आणखी २५ शेतकऱ्यांनी केली आहे.

Complaint of farmers against Hasan Mushrif
आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आणखी २५ शेतकऱ्यांची तक्रार

कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासद व शेअर्स प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी फसवणूक केली असल्याची तक्रार आणखी २५ शेतकऱ्यांनी गुरुवारी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दाखल केली आहे. यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

याआधी मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात याच प्रकारची तक्रार कागलचे विवेक कुलकर्णी व इतर शेतकऱ्यांनी दाखल केलेली आहे. तर आज शिवाजी जाधव, प्रकाश डावरे आदींनी पोलीस उपाधीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्याकडे तक्रार नोंदवली.

हेही वाचा – आयुक्तालयाच्या स्थलांतराने राज्यांच्या वस्त्रोद्योग प्रगतीला खीळ

हेही वाचा – कोल्हापूरमध्ये पालकमंत्री हटाव मोहिम सुरू

आर्थिक फसवणूक

तक्रारीत म्हटले आहे की, आमदार हसन मुश्रीफ यांनी उभारलेल्या सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लि. बेलेवाडी या कारखान्याचे सभासद होण्याकरिता म्हणून आम्ही प्रत्येकी १० हजार रुपये दिले आहेत. हा कारखाना मुश्रीफ यांच्या कुटुंबातील लोकांचा व काही एलएलपी कंपनीच्या मालकीचा आहे. यामध्ये अन्य कोणीही सभासद केलेले नाहीत, असे आम्हाला नुकतेच समजले आहे. शेतकऱ्यांकडून केवळ पैसे जमा केले असल्याने याबाबतची तक्रार मुरगूड पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये मुश्रीफ यांनी आमची आर्थिक फसवणूक केली आहे, अशी आमची तक्रार आहे. या चौकशी प्रकरणात आमचा विस्तृत जबाब नोंदवून घ्यावा.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 22:49 IST

संबंधित बातम्या