महापालिका निवडणुकीमध्ये मिळालेले यश पक्ष हितासाठी सुसंगतच असल्याचा दावा निकालानंतर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे आमदार नीलम गोऱ्हे यांनी सेनेला अपेक्षित यश मिळाले नसले तरी जनतेचे प्रश्न सोडविण्यात शिवसेना मागे राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.
भाजपाला यशच – पालकमंत्री
महापालिका निवडणुकीतील यशासाठी खूप प्रयत्न केले होते, पण सत्ता स्थापनेपासून ते दूर आहे. गतवेळी भाजपाचे तीन सदस्य होते. आता ही संख्या बारा पर्यंत गेली आहे. उलट काँग्रेस ३२ वरुन ३७, तर राष्ट्रवादी २५ वरुन १५ पर्यंत खाली घसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल.
राष्ट्रवादीला आमंत्रण – सतेज पाटील
जनतेने दिलेल्या भरघोस मतामुळे काँग्रेस निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमचा मित्र पक्ष आहे. निवडणुकीच्या काळता त्यांनी भाजप-सेनेविरोधात भूमिका घेतली होती. आता सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही आमंत्रण देत असून त्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेतली असता सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
श्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष – मुश्रीफ
राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. सतेज पाटील यांच्याशी झालेल्या चच्रेत गत सभागृहातील फॉम्र्युला कायम ठेवण्याबाबत चर्चा झाली. हा प्रस्ताव तसेच भाजप-ताराराणी कडून आलेला प्रस्ताव श्रेष्ठींना कळविण्यात येणार आहे. भाजप-ताराराणीचा बाहेरुन पािठबा घेऊन राष्ट्रवादीचा महापौर होऊ शकतो.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Nov 2015 रोजी प्रकाशित
काँग्रेस, भाजपचे यशाचे दावे
सेनेला अपेक्षित यश मिळाले नसले तरी जनतेचे प्रश्न सोडविण्यात शिवसेना मागे राहणार नाही

First published on: 03-11-2015 at 03:32 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress bjp claims success