कोल्हापूर : महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी व्हीआयपी प्रवेशिका बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश | Court orders closure of VIP entry for Mahalakshmi Devi darshan amy 95 | Loksatta

कोल्हापूर : महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी व्हीआयपी प्रवेशिका बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश

करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी अतिविशिष्ट व्यक्तींसाठी प्रवेशिका बंद करण्याचे आदेश सोमवारी येथील न्यायालयाने दिले.

कोल्हापूर : महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी व्हीआयपी प्रवेशिका बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश
( संग्रहित छायचित्र )

करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी अतिविशिष्ट व्यक्तींसाठी प्रवेशिका बंद करण्याचे आदेश सोमवारी येथील न्यायालयाने दिले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी अतिविशिष्ट व्यक्तींना (व्हीआयपी ) प्रवेश व सशुल्क प्रवेशिका देण्याचा निर्णय घेतला होता. या विरोधात महालक्ष्मी देवीचे श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्य शासनाने सन २०१० मध्ये अति विशिष्ट व्यक्तींना दर्शन देण्यास मज्जाव करणारा शासन निर्णय आदेश निर्गमित केला होता. त्याचे उल्लंघन केले जात असल्याने हा प्रकार रोखण्यात यावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली होती. याबाबत २३ सप्टेंबर रोजी तिसरे सह दिवाणी न्यायाधीश के. आर. सिंघेल यांनी देवस्थान समितीच्या निर्णयाला येथील २६ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्थगिती आदेश दिला होता.

आज या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने वरील प्रमाणे निर्णय दिला. देवस्थान समितीने राज्य शासनाच्या ७ सप्टेंबर २०१० रोजीच्या आदेशाचे पालन करावे, असे त्यांनी सुचित केले. याचवेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना पत्रकार परिषदेमध्ये न्यायालयीन आदेशाची खातरजमा करून सावधगिरीने विधान करावे, असेही निर्देश दिले आहेत. मुनेश्वर यांच्यावतीने ॲड. नरेंद्र गांधी व ॲड. ओंकार गांधी यांनी काम पाहिले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
महालक्ष्मी मंदिर परिसरावर ‘ड्रोन’ची नजर; नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दक्षता

संबंधित बातम्या

राजकीय डावपेचात गडिहग्लज साखर कारखान्याचे अस्तित्व टांगणीला

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शेजारी बसलेल्या शाहरुख खानला ओळखू शकली नाही ‘ही’ अभिनेत्री; नेटकरी म्हणाले…
विश्लेषण: फिफा वर्ल्ड कपमध्ये मोरोक्को, जपान बलाढ्य युरोपिय देशांपुढे आपापल्या गटांत अव्वल कसे राहिले?
“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजुला उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा…”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
प्लास्टिकचा कचरा द्या आणि मोफत चहा प्या! उदयपूरच्या युवकाचा स्वच्छतेसाठी भन्नाट उपक्रम; पाहा Video
बांगलादेशी आणि रोहिंग्यांबद्दलचं वक्तव्य परेश रावल यांना पडलं महागात; माफी मागूनही तक्रार दाखल