कोल्हापूर: कोल्हापूर मतदारसंघाचा चेहरा हिंदूत्ववादी आहे. मतदारसंघाचे राजकीय रसायन बदलले आहे. ते हिंदूत्व भाजप आणि भगवा यांच्या बाजूने गेले असल्याने आमचा विजय निश्चित आहे, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार, अनाचार यामुळे जनतेमध्ये प्रचंड राग आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या माध्यमातून जनता त्याचा दाखला देईल. भाजपचा १०७ वा आमदार निवडून देण्याची कामगिरी या निवडणुकीत मतदान करून दाखवेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र की पश्चिम बंगाल?

या मतदारसंघात सत्ताधारी नेते, मंत्री यांनी प्रचंड दहशत पसरवण्याचे काम केले आहे. ते पाहता हा महाराष्ट्र आहे की पश्चिम बंगाल असा प्रश्न पडला पडला आहे. .

भाजपचा श्वास हिंदूत्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप या निवडणुकीत हिंदूत्वाचा आधार घेत असल्याचे विधान केले होते. त्यावर फडणवीस म्हणाले, भाजपचा श्वास हिंदूत्व आहे.