करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला भक्तगणांनी सुमारे ४७ तोळ्याचा सोन्याचा शोभिवंत किरीट अर्पण केला आहे. २४ लाख रुपये किमतीचे हे झगमगीत किरीट शनिवारी देवीला चढवण्यात आले. करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला देशभरातील भक्तांकडून सोने-चांदीचे अलंकार अर्पण केले जातात. जालना येथील एका अध्यात्मिक संस्थांनने शुक्रवारी ४७० ग्राम वजनाचे शुद्ध सुवर्णजडित किरीट अर्पण करायचे ठरवले होते. यासाठी संस्थांनचे पुजारी आणि काही पदाधिकारी काल किरीट घेऊन आले होते. त्यांनी तो देवीला तो अर्पण करून दर्शन घेतले. किरटाचे अंदाजे किंमत २४ लाख रुपये आहे. किरीट देवस्थान उच्च महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला. समितीने साडी चोळी व प्रसाद देऊन या भाविकांचा सत्कार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कोल्हापूर: लोकराजा शाहूंना अभिवादन करण्यासाठी शाहूनगरी १०० सेकंद स्तब्ध

स्वर्णिम आठवणी यापूर्वी कलकत्ता येथील एका भक्ताने ३२ लाख रुपये किमतीचा सोन्याचा किरीट अर्पण केल्याच्या घटनेला आज उजाळा मिळाला. तर कराड येथील अभिजीत पाटील यांनी पाच तोळे वजनाचे स्वर्ण किरीट देवीला गुरुवारी अर्पण केला होता, अशी माहिती देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर देसाई यांनी दिली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotees offered elegant crown of gold worth 47 tolas at the feet of goddess mahalakshmi zws
First published on: 06-05-2023 at 20:38 IST