धर्माच्या नावावर देशात विद्वेष ,हिंसा पसरवली जात आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी कोल्हापुरात केली.भारत जोडो यात्रा राज्यात येत आहे, त्याच पहिला मेळावा कोल्हापूर येथे झाला त्यावेळी ते बोलत होते.

भारताचे संविधान धोक्यात आहे.यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. यामध्ये जोडले गेलो तर कोणी आपल्याला दूर करू शकत नाही. देश म्हणून आपण एक आहोत. ते द्वेष पसरवत आहेत. आम्ही देश जोडत आहे. काहीही झाले तरी भारत जोडो यात्रा कोणीही रोखू शकत नाही. भाजप-आरएसएसने पसरवलेला द्वेष आणि हिंसाचार थांबवणे हा आमच्या यात्रेचा उद्देश आहे. त्याला आतापर्यंत जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. देशात बदलत चाललेले वातावरण निर्माण होत आहे, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत हे मशिदीत जात आहेत. संघाचे लोक महागाई, बेरोजगारी वाढत आहे असे सांगत आहेत. हा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे. यात्रेत सहभागी होता आले नाही तर गल्ली ,गावात तिरंगा झेंडा घेऊन यात्रा काढा, असे आवाहन त्यांनी केले.