कोल्हापूर येथील श्री जगद्गुरू शंकराचार्य करवीरपीठाच्या केसापूर पेठ येथील जागेबाबत द्यावयाच्या रकमेचे आजच्या दराने मूल्यांकन करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.
यासंदर्भात तत्कालीन कराराचा अभ्यास करण्यात यावा अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. करवीरपीठाच्या केसापूर पेठ येथील जागेच्या भाडय़ात आजच्या दराने मूल्यांकन करून वाढ करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्याबाबत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी हे आदेश दिले.
आमदार शोभाताई फडणवीस, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव मििलद म्हैसकर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमित सनी, कोल्हापूर मनपा आयुक्त पी. शिवशंकर आदी या वेळी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2016 रोजी प्रकाशित
श्री जगद्गुरू शंकराचार्य करवीरपीठाच्या जागेबाबत मूल्यांकनाचे निर्देश
तत्कालीन कराराचा अभ्यास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-02-2016 at 03:40 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Directions of evaluation about shri jagadguru shankaracharya karavirapitha place