Drone Mahalakshmi temple area Vigilance occasion Navratri festival ysh 95 | Loksatta

महालक्ष्मी मंदिर परिसरावर ‘ड्रोन’ची नजर; नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दक्षता

नवरात्र उत्सवात महालक्ष्मी मंदिर परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने या वर्षी देवस्थान समितीने ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने संपूर्ण उत्सवाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

महालक्ष्मी मंदिर परिसरावर ‘ड्रोन’ची नजर; नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दक्षता
नवरात्र उत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिर परिसरात नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

कोल्हापूर : नवरात्र उत्सवात महालक्ष्मी मंदिर परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने या वर्षी देवस्थान समितीने ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने संपूर्ण उत्सवाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. याद्वारे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही वापर करण्यात येणार आहे. या ड्रोन कॅमेऱ्याचे शनिवारी अनावरण करण्यात आले.

नवरात्रीमध्ये कोल्हापूर तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेऱ्यांचा आधार घेण्यात येत आहे. देवस्थानच्या  सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे कर्मचारी राहुल जगताप, अभिजित पाटील यांनी यासाठी प्रशिक्षण घेतले आहे. ड्रोन अनावरणप्रसंगी देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, जुना राजवाडा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, राजेंद्र कांबळे, प्रशांत गवळी व देवस्थान कर्मचारी उपस्थित होते.

चोरीच्या घटनांना आळा..

आपत्ती व्यवस्थापन व पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. अनिकेत बागल, अभिषेक बागल, अवधूत चौगुले, सागर खेडकर हे कर्मचारी गेली पाच वर्षे सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात काम करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरीच्या अनेक घटनांची उकल करण्यात आली.

अतिरिक्त कॅमेरे..

मंदिराच्या बाहेरील ५०० मीटर परिघामध्ये मध्ये ‘७० आयपी’ स्वरूपाचे अतिरिक्त कॅमेरे बसवण्यात आले आहेत. महालक्ष्मी मंदिर व मंदिरबाहेरील आवारामध्ये एकूण २०० सीसीटीव्ही कॅमेरे यांची नजर राहणार आहे. त्याचे नियंत्रण पोलीस मंडप, देवस्थान नियंत्रण कक्ष व राजवाडा पोलीस ठाणे येथे असणार आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कोल्हापूर : मराठी चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांना दणका

संबंधित बातम्या

समीर गायकवाडच्या चौकशीतून दाभोलकरांच्या हत्येबाबत धागेदोरे
कोल्हापूर : नृसिंहवाडीत यावर्षीचा दुसरा दक्षिणद्वार सोहळा; स्नानाकरता भाविकांची गर्दी
कोल्हापूर : राहुल गांधी यांनी काँग्रेस जोडो यात्रा काढावी – शायना एन.सी
जागावाटप अवघड, तर पक्षविस्तार कसा?; कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे चित्र

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे : सहकारी तत्त्वावर तांदळाचे उत्पादन; सोमवारपासून इंद्रायणी तांदूळ महोत्सव
“दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा, असं…”, भाजपा आणि आपबाबत संजय राऊत यांचं वक्तव्य
Rohit Sharma Injured: जखमी असूनही खेळायला उतरला रोहित, पत्नी रितिका आणि सूर्यकुमारच्या ट्विटने जिंकले मन
Video: बॉलिवूड पदार्पणाचा आनंद गगनात मावेना, बार काउंटरवर चढून बेभान होऊन नाचली ‘ही’ मराठी अभिनेत्री
पुणे : शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण