कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक भागात वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना रात्र अंधारात काढावी लागली.

 गेल्या पंधरा दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली होती. सांगलीतही पावसाची हजेरी सांगली : गेल्या चार दिवसांपासून वाढलेल्या उष्म्यानंतर शनिवारी दुपारी सांगली शहरासह मिरज पूर्व भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यातील कमाल तापमान ३९ अंशावर पोहोचले असून किमान तापमान २५ अंशावर आहे.

सोलापूरचा पारा ४१.७ अंशांवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापूर : शनिवारी तापमानाचा पारा पुन्हा वाढत ४१.७ अंश सेल्सियसपर्यंत मोजण्यात आला. होळीच्या आदल्या दिवशी शहराचे तापमान ४० अंश सेल्सियस इतके वाढले होते. त्यानंतर सलग दोन दिवस तापमानाचा पारा वाढत ४१.६ अंश सेल्सियसपर्यंत गेला होता.