कोल्हापूर : सलग महिनाभर दाढी करायचीच नाही. दाढीसाठी होणाऱ्या खर्चाची बचत करायची आणि ही रक्कम ‘नो शेव’ या उपक्रमाअंतर्गत सामाजिक कार्याला द्यायची. त्यातून अनेक रुग्ण आणि गरजूंना मदत केली जाते. अशीच मदत आज मावळत्या सूर्याला साक्षी ठेवत कोल्हापुरातील तरुणाईने देऊ केली.

गेल्या सहा वर्षांपासून कोल्हापूरातील ५०० हुन अधिक तरुण एकत्र येत कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करत आहेत. ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ असे त्यांच्या मोहिमेचे नाव आहे. कोल्हापुरात ही मोहीम दरवर्षी चांगलीच चर्चेत असते. दरवर्षी एक महिना दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचवून ते पैसे मदत म्हणून कॅन्सरग्रस्त रुग्णांना देतात अशी ही मोहीम आहे. यावर्षी सुद्धा कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांच्या हस्ते ३ रुग्णांना प्रत्येकी १० हजार रुपये मदत करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी या मोहिमेचे कौतुक करत यापुढच्या काळात सुद्धा ही मोहीम अधिकाधिक मोठी व्हावी या शुभेच्छा दिल्या. शिवाय प्रेस क्लब कोल्हापूर सुद्धा या सामाजिक कार्यात आपल्या सोबत असेल असा विश्वास सुद्धा अध्यक्ष शीतल धनवडे यांनी दिला. कोल्हापूर प्रेस क्लब येथे हा मदत प्रदान कार्यक्रम पार पडला यावेळी ते बोलत होते.

Electricity Contract Workers, maharashtra, Promised Age Relaxation, Permanent Jobs, Yet to Be Fulfilled, nagpur, electricity workers, marathi news, devendra fadnavis,
कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…

आणखी वाचा-कोल्हापूरात ‘द दारूचा नाही द दुधाचा’ उपक्रमाला प्रतिसाद

‘नो शेव्ह’ काय आहे?

जगभरात नोव्हेंबर महिन्यात ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ ही मोहीम सुरू असते. याच मोहिमेचे कोल्हापुरातील तरुणांनी ५ वर्षांपूर्वी अनुकरण करायचे ठरविले. त्यानुसार त्यांनी व्हाट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचे काम सुरू केले. त्यांच्या या मोहिमेला आजपर्यंत कोल्हापुरातील ५०० हुन अधिक तरुणांनी पाठिंबा दिला आहे आणि दरवर्षी ही संख्या वाढतच चालली आहे. याअंतर्गत दरवर्षी एक महिना दाढी न करता दाढीसाठी जेव्हढे पैसे खर्च होतात ते वाचवून ती रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी द्यायची या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली. सुरुवातीला या मोहिमेबद्दल माहिती मिळाल्यानंतर शेखर पाटील आणि दर्शन शहा यांनी हा विचार त्याच्या मित्रमंडळींना बोलून दाखवला होता. त्यानुसार हा विचार एका मोहिमेत बदलला. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कर्करोगाचे हजारो रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी आपण ही मोहीम सुरू करू असा निर्णय सर्वांनी केला. त्यानुसार सलग ६ वर्षे ही मोहीम अगदी उत्साहाने राबविण्यात येत आहे. आजपर्यंत जवळपास ३० रुग्णांना आर्थिक मदत केली आहे.

सहभाग कोणाचा?

या मोहिमेबाबत समजताच अनेकांकडून याचे कौतुक झाले. यामध्ये हळूहळू अनेक जण जोडले गेले. यामध्ये अनेक क्षेत्रातील युवक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांपासून वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, सीए, पत्रकार, राजकीय व्यक्ती तसेच सामाजिक कार्यकर्ते सुद्धा जोडले गेले असून ते सुद्धा युवकांसोबतच आपल्या परीने दाढीवर होणारा एक महिन्याचा खर्च वाचवून मोहिमेला देत आहेत. त्यामुळे या मोहिमेला अनेक मोठ्या व्यक्तींचा सुद्धा हातभार लागत आहे हे या मोहिमेचे यश असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी म्हंटले आहे.

आणखी वाचा-जिल्हा नियोजन समित्यांचे नाव बदलून आता ‘सत्तारूढ निधी वितरण समिती’ असे नाव द्या; आमदार सतेज पाटील यांचा संताप

३० कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत

या मोहिमेची आजपर्यंत पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रत्येक वर्षी आधीपेक्षा अधिकच प्रतिसाद मिळत चालला आहे. जवळपास ५०० तरुण मोहिमेत सक्रिय झाले असून ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी ४ ते ५ कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना जमा झालेली मदत देण्यात येते. आजपर्यंत ३० कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करण्यात आली असून जवळपास दोन ते अडीच लाखांहून अधिक मदत करण्यात आली आहे. दरम्यान, कोल्हापूरात अशा पद्धतीची मोहीम यापूर्वी कधीच पाहिली नाही. पण या तरुणांनी ज्या पद्धतीने ही मोहीम हाती घेतली आहे याचे खुप कौतुक वाटत असल्याच्या भावना कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून दरवर्षी ऐकायला मिळतात.

कॅन्सरग्रस्त रुग्णांना विविध योजनांची देखील विविध उपक्रम घेऊन माहिती करून देण्यासाठी आपण स्वतः मदत करू, असा विश्वास शीतल धनवडे यांनी व्यक्त केला. शिवाय रुग्णांच्या उपचारासाठीही काही मदत करता येत असेल तर ते सुद्धा प्रयत्न करू,असे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांनी सांगितले. नो शेव्ह नोव्हेंबरचे शेखर पाटील, दर्शन शहा, गीतेश डकरे, ओंकार सोनवणे, पंकज कोकणे यांच्यासह नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेचे सदस्य उपस्थित होते.