घरफाळा थकबाकी प्रकरणी वसुली मोहीम टोकदार करताना महापालिका प्रशासनाने बड्या समूहांनाही लक्ष्य केले असून शुक्रवारी गंगावेश येथील लोटस रुग्णालयाला १ कोटी १९ लाखाच्या घरफाळा थकबाकीबाबत सील ठोकण्यात आले.
लोटस रुग्णालयाचे १ कोटी १९ लाखाच्या घरफाळा थकबाकीबाबत आयुक्तांसमोर सुनावणी घेण्यात आली होती. सुनावणीमध्ये त्यांना घरफाळा भरणेसाठी १५ दिवसाची मुदत दिलेली असताना देखील घरफाळा भरला नसलेने आयुक्तांच्या आदेशाने लोटस हॉस्पिटल सील करण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांचे मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक विशाल सगुते, लिपीक सुभाष ढोबळे, गणेश भोसले, संजय अतिग्रे व कर्मचारी यांनी केली.
थकीत मालमत्ता कर असलेल्या मिळकतीच्या बाबतीत आयुक्तांसमोर सुनावणी घेणेत आलेली आहे. या सुनावणीमध्ये थकीत कराची रक्कम जमा करणेबाबत आयुक्तांनी काही दिवसांची मुदत दिलेली आहे. मुदत संपलेल्या मालमत्तेवर कारवाई करुन अहवाल देणेच्या सूचना आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिलेल्या आहेत. थकीत घरफाळा भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2016 रोजी प्रकाशित
घरफाळा थकबाकीबाबत कोल्हापुरात रुग्णालयांना टाळे
लोटस रुग्णालय
Written by लोकसत्ता टीम

First published on: 06-02-2016 at 03:00 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hospitals locked in kolhapur due to property tax arrears