कोल्हापूर : लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत सुरू केलेल्या मतदार जनजागृती अभियानामधील स्वीप अंतर्गत कोल्हापूर शहरातील गांधी मैदानावर १० हजार ४९५ विद्यार्थ्यांनी विक्रमी अशी मानवी रांगोळी साकारून मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला. यावेळी शहरातील ३८ हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवून जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील नवीन विक्रम नोंदविण्यात मोलाची भर घातली.

राष्ट्रीय विक्रमाचा दावा ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचा “नॅशनल रेकॉर्ड” व “एशिया पॅसिफीक रेकॉर्ड” ची नोंद झाली. यावेळी मिळालेला सन्मान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित विद्यार्थी त्यांचे पालक व सर्व शिक्षकांना समर्पित केला. यावेळी ते म्हणाले, देशस्तरावर नोंद झालेल्या या उपक्रमातून मतदारांना चांगला संदेश जाईल, यातून निश्चितच मतदान टक्केवारी वाढण्यास भर पडेल. या उपक्रमाला मनपा आयुक्त के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरीक्त मनपा आयुक्त केशव जाधव, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक तथा नोडल अधिकारी स्वीप नीलकंठ करे, ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचे निरीक्षक डॉ.महेश कदम, सहायक नोडल वर्षा परिट, श्री.धायगुडे उपस्थित होते.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
jee main result
अरे व्वा! जेईई मेन परीक्षेत तब्बल ५६ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० गुण, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश!
Tata Institute of Social Science, Suspends Dalit Ph.D. Student, Ramdas KS, Misbehavior, Anti National Stance, tiss mumbai, tiss suspends phd student, mumbai tiss, tiss Suspends Dalit Student, tiss controversy,
‘टिस’कडून दोन वर्षांसाठी दलित विद्यार्थ्याचे निलंबन, वारंवार गैरवर्तन आणि देशविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात

हेही वाचा : कोल्हापुरात शिंदे गट – भाजप मधील तणाव वाढीस

कोल्हापूरने चेन्नईला मागे टाकले

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन २०२४ साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने स्वीप अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्हयातील सर्वच मतदारांपर्यंत संदेश जाईल की आपण बाहेर पडून ७ मे रोजी मतदान केले पाहिजे. लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवात सहभागी होवून मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोल्हापूर मनपाच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी कोल्हापूर जिल्हयातील मागील निवडणूकीच्या मतदान टक्केवारीत अधिक भर टाकत शंभर टक्के मतदानाजवळ जावू अशी आशा व्यक्त केली.

हेही वाचा : कोल्हापूरसाठी सांगलीचा बळी नको, काँग्रेस नेत्यांचे नेतृत्वाकडे आर्जव

मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी लोकशाहीतील सर्वात मोटा सण असलेल्या निवडणूकीमधे नागरिकांनी आपला हक्क बजावला पाहिजे असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना आपल्या लोकशाहीची, निवडणूक प्रक्रियेची माहिती अशा उपक्रमातून आतापासूनच दिली जात असल्याचे सांगितले. यानंतर ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौंडेशनचे निरीक्षक डॉ. महेश कदम यांनी १० हजार ४९५ विद्यार्थ्यांनी विक्रमी नोंद केल्याचे सांगून चेन्नई शहरानंतर भारतात कोल्हापुरात असा उपक्रम नोंदविला गेल्याची घोषणा केली. या विक्रमी नोंदीचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह डॉ.कदम यांनी जिल्हधिकारी, आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान केले. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा उपनिबंधक तथा नोडल अधिकारी स्वीप नीलकंठ करे, सहायक नोडल वर्षा परिट, धायगुडे यांनी पार पाडले.