कोल्हापूर : आम्हीही शिवसेनेकडून निवडणूक लढवलेली होती. आता भाजपात असलो म्हणून कोणी महत्व देणार नसेल तर चालणार नाही. सन्मान मिळत नाही तोपर्यंत प्रचार करणार नाही, असे म्हणत मयूर सहकारी उद्योग समूहाचे नेते संजय पाटील यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी मिळण्यासाठी मोठी स्पर्धा होती. खासदार धैर्यशील माने यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी असल्याचा मुद्दा उपस्थित करून भाजपचे केंद्रीय रासायनिक खत मंत्रालयाचे संचालक, पंचायत राज समितीचे उपाध्यक्ष संजय पाटील, आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर यांचे बंधू संजय पाटील तसेच भाजपचा घटक पक्ष असलेले मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले होते. अखेर महायुतीने पुन्हा धैर्यशील माने यांना रिंगणात उतरवायचे ठरवलेले आहे.

हेही वाचा : काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur sanjay patil criticizes hatkanangale lok sabha candidate dhairyasheel mane css
First published on: 01-04-2024 at 16:28 IST