इचलकरंजी येथील युवा उद्योगपती यश शीतल मणेरे (वय २४) यांचे आकस्मिक निधन झाले. बुधवारी येथील पंचगंगा नदीघाटावर त्यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नव महाराष्ट्र सहकारी सूत गिरणीचे माजी अध्यक्ष सुधाकर मणेरे यांचे नातू व उद्योगपती शीतल मणेरे यांचे चिरंजीव यश हे मनमिळावू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी उद्योगामध्ये चांगले नाव कमावण्यास सुरुवात केली होती. त्यांना किडनीचा आजार होता. त्यांच्या आईने किडनी दिली होती. तर प्रगत वैद्यकीय उपचारासाठी ते दोन दिवसांनी सिंगापूरला जाणार होते. तत्पूर्वी गोवा येथे सहलीला गेले असताना त्यांचा आजार बळावला. वैद्यकीय उपचार सुरू असताना त्यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले.
गोवा येथून त्यांचे पाíथव पहाटे येथील औद्योगिक वसाहतीतील निवासस्थानी आणण्यात आले. तेथून सकाळी अंत्ययात्रा निघाली. पंचगंगा नदीघाट येथे अंत्यविधी करण्यात आला. या वेळी झालेल्या शोकसभेमध्ये माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील, उद्योगपती संजय घोडावत, माजी आमदार राजीव आवळे, रोटरी क्लबचे हिराचंद बरगाले यांनी आदरांजली वाहिली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2015 रोजी प्रकाशित
इचलकरंजीतील उद्योगपती यश मणेरे यांचे निधन
इचलकरंजी येथील युवा उद्योगपती यश शीतल मणेरे (वय २४) यांचे आकस्मिक निधन झाले. पंचगंगा नदीघाटावर त्यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Written by दया ठोंबरे

First published on: 10-12-2015 at 02:22 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industrialist yash manerey death