कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. शाहूवाडी, पन्हाळा तालुक्याला पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून दूरवर  जाऊन पडले. घरातील धान्य मोठ्या प्रमाणामध्ये भिजले आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाने हजेरी लावली. शाहूवाडी. पन्हाळा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तत्पूर्वी, दुपारी वादळी वारे घोंगावू लागले  होते. जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे अँगल्ससह उडून पडले. काही ठिकाणी ते १०० ते२०० फूट अंतरावर जाऊन पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ख्रिस्ती, मुस्लीम संस्थांना विदेशातून धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध; मिलिंद परांडे यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांना फटका 

घुंगुर (तालुका शाहूवडी) येथील दाजी पाटील यांच्या घराचे पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले. ते सुमारे २०० फुटावर जाऊन पडले. छत उडाल्याने घर उजाड झाले. पाठोपाठ आलेल्या मुसळधार पावसामुळे ५० पोती भातासह धान्य भिजले. दोन्ही तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना पावसाचा फटका सहन करावा लागला.  फोटो – १. दाजी पाटील यांच्या घराचे पत्रे दूरवर जाऊन पडले. २. छत उडाल्याने त्याचे घर असे उजाड झाले. ३. पन्हाळा पूर्व भागातील घरांना असा फटका बसला.