कोल्हापूर: राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त मोका गुन्हातील कुख्यात गुंड अमोल भास्कर याचे मोठे मोठे फलक शहरात मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेसोबत हे फलक लावण्यात आल्याने त्याची शहरात एकच चर्चा आहे. गुंड अमोल भास्कर व त्याच्या टोळीने शहरात उच्छाद मांडला आहे. त्याच्या विरोधात खून, अपहरण,खाजगी सावकारी, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांची मालिकाच नोंद आहे. या कारानाम्यामुळे २८ गुन्हे दाखल असलेल्या अमोल भास्कर टोळीवर गतवर्षी दिवाळी मोका (संघटित गुन्हेगारी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना खंडणीप्रकरणी त्यास पकडले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विधाना विरोधात सीमाभाग, कोल्हापुरातून संताप

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur gangster banner chairman of the planning banner displayed with chief minister ysh
First published on: 23-11-2022 at 19:38 IST