कोल्हापूर : कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासन स्तरावर याबाबत गंभीरपणे काम सुरू आहे. याला सामाजिक संस्थांच्या सहभागाने या स्वच्छतेच्या चळवळीला बळ मिळाले आहे. ‘पुनर्चक्रीकरण भिंत’ हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरला आहे, असे मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. येथील अवनि संस्था आणि किर्लोस्कर ऑईल इंजिन्स यांच्या सयुक्त विद्यमानाने सामाजिक संस्थाच्या सहकार्याने संपन्न झालेल्या ४ दिवसीय उत्सव पुनर्चक्रीकरण सोहळा समारोहात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी ‘पुनर्चक्रीकरण भिंत’ या उपक्रमाला भेट देऊन या त्याचे कौतुक केले. संजय पाटील यांनी अवनि व एकटी संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या कचरा व्यवस्थापन कामाची माहिती दिली. कचरा वेचक महिलांच्या शिष्ट मंडळाने खावटी योजनेच्या प्रमुख मागणीसह मागण्यांचे निवेदन दिले.तत्पूर्वी तृप्ती देशपांडे यांनी घरातील ओल्या कचऱ्यापासून कसे खत बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी अनिल चौगले,डॉ.दिलीप माळी,स्मिता खामकर,मंगला काळे होते. अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली साताप्पा मोहिते,पूजा लोहार,स्नेहल जाधव,पुष्पा शिंदे,सुरेखा कांबळे, सविता कांबळे, साहिल शिकलगार, मनीषा कांबळे यांनी नियोजन केले. प्रास्ताविक शरद अजगेकर तर आभार वनिता कांबळे यांनी मानले.