कोल्हापूर महानगरपालिकेसाठीच्या ८१ जागांसाठीचे मतदान रविवारी सुरळीत पार पडले. कोल्हापूरकरांनी यंदा मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. हाती आलेल्या प्राथमिक अंदाजानुसार कोल्हापूरात साडेपाच वाजेपर्यंत सुमारे ७२ टक्के मतदानाची नोंद झाल्याचे समजते. कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीची एक-दोन प्रकरणे वगळता संपूर्ण कोल्हापूरात आज चोख बंदोबस्तात सुरळीत मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. मतदान केंद्रांबाहेर लांबचलांब रांगा सकाळी पाहायला मिळाल्या. हे चित्र दुपारपर्यंत कायम होते. सकाळच्या सत्रात २५ टक्क्यांची नोंद झाली तर दुपारी ३ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार मतदानाच्या आकडेवारीने अर्धशतक गाठले होते. शेवटचा अर्धातास बाकी असतानाही मतदान केंद्रांबाहेर लांब रांगा पाहायल मिळाल्या. सुटीचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदार राजा बाहेर पडला आणि आपला हक्क बजावताना दिसला. आता या वाढीव टक्केवारीचा नेमका कोणत्या पक्षाला फायदा होतो ते उद्याच्या निकालातून समोर येईल.
दरम्यान, सकाळी काही ठिकाणी कार्यकर्त्यांमधील वादामुळे वातावरण तापले होते. मात्र, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मतदान सुरळीत सुरू आहे. कोल्हापूरात बाजार मतदान केंद्रावर एव्हीए मशिन वेळेआधी सुरू केल्यामुळे केल्याने वाद निर्माण झाला होता. ताराराणी आघाडीचे उमेदवार आणि निवडणूक अधिकाऱयांमध्ये बाचाबाची झाली होती.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2015 रोजी प्रकाशित
कोल्हापूरात मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद, ७२ टक्के मतदान
कोल्हापूर महानगरपालिकेसाठीचे सुरळीत सुरू असून मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 01-11-2015 at 11:32 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur municipal corporation voting updates