कोल्हापूर : इचलकरंजी येथे क्रिकेट खेळताना निर्माण झालेल्या जुन्या वादातून युवकावर सोमवारी कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. सुरज अशोककुमार राठी (वय ३२, रा. नारायण पेठ) असे जखमी युवकाचे नाव असून तो आवाडे समर्थक कार्यकर्ता आहे. या प्रकरणी प्रणव मानकर व समर्थ राजकुमार जाधव हे दोघेजण स्वत:हून पोलिसात हजर झाले.

हेही वाचा – …अन पार्थ पवारांचा पराभव आम्ही विसरू शकत नाहीत – संजोग वाघेरे

हेही वाचा – सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या निकालात वाढ, राज्याचा निकाल किती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नारायण पेठ परिसरात राहणारा सुरज राठी हा एका कापड पेढीवर दिवाणजी म्हणून काम करतो. सोमवारी पेढीचे शटर उघडत असतानाच पाठीमागून आलेल्या दोघांनी लाथा मारत सुरज याला खाली पडून कोयत्याने डोक्यावर वार केले. जीव वाचविण्यासाठी समोर असलेल्या पेढीत शिरला. परंतु हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत तेथेही पुन्हा कोयत्याने वार केले. वार चुकवत सुरजने पेढीतील बाथरुमध्ये शिरून दरवाजा लावून घेतल्यामुळे तो बचावला. नागरिकांनी राठी यास तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.