कोल्हापूर : समाजात लोकांच्या मेंदूला भूल दिली गेली आहे. भारतीयत्व, संस्कृती, मूल्य आपण विसरून गेलो आहोत. अशा स्थितीत समाजाला जागे करण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षा लेखक प्रवीण बांदेकर यांनी रविवारी केले. निमशिरगाव येथे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व साहित्य सुधा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २७ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. साहित्य संमेलने लोकांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्याचे, माणसा माणसांमधील संवाद वाढीस लावण्याचे, चिकित्सा, विचारांचे मंथन करण्यास चालना देतात. त्यातून नवीन लेखक, विचारवंत, वाचक निर्माण होतात, असेही ते म्हणाले. डॉ. अतिका पटेल, डॉ. अजित बिरनाळे, डॉ. धवल पाटील, यांच्या उपस्थित ग्रंथदिंडी सभामंडपात दाखल झाली. पी. बी.पाटील सहित्यनगरीत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले.

हेही वाचा : काजू पीकापासून मद्यनिर्मिती, काजू बी परताव्याचा निर्णय लवकरच – अजित पवार

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

कवी संमेलनास प्रतिसाद

समाजरत्न पुरस्कार कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांना, साहित्यरत्न पुरस्कार कवी रफिक सूरज यांना तर शेतकरी राजा पुरस्कार कोथळीच्या शीतल बोरगावे यांना प्रदान करण्यात आले. दुपारी डॉ अजित बिरनाळे यांनी कथा वाचन केले. डॉ रवींद्र श्रावस्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी सरपंच अश्विनी गुरव, उपसरपंच सुप्रिया सावंत, स्वस्तिक पाटील, वैशाली पाटील, गोमटेश पाटील, मनोज पाटील, संजय धनाजी यांच्यासह ग्रामस्थ, साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. शांताराम कांबळे यांनी प्रास्ताविक, स्वागताध्यक्ष सावकर मादनाईक यांनी स्वागत, रावसाहेब पुजारी यांनी प्रास्ताविक, एन. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. साहित्यसुधा स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते झाले.