कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना बुधवारी ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ जाहीर झाले. या अधिकाऱ्यांरी नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने हे पदक जाहीर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याचे कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक असलेले डॉ. अभिनव देशमुख यांनी गडचिरोलीत अधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळत असताना बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. याशिवाय इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक गणेश बिराजदार आणि कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे हे देखील या पदकाचे मानकरी ठरले आहेत.

नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा पार पाडल्याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ‘आंतरिक सुरक्षा पदक’ दिले जाते. महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भरघोस योगदान देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यंना या पदकाने सन्मानित केले जाते.

या अधिकाऱ्यांचा पदकाने सन्मान

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कर्तव्यावर असलेले डॉ. अभिनव देशमुख (जिल्हा पोलीस अधीक्षक), गणेश बिराजदार (पोलीस उपविभागीय अधिकारी), संजय मोरे (पोलीस निरिक्षक), दीपक भांडवलकर (सहाय्यक पोलीस निरिक्षक), अजित पाटील, राहूल वाघमारे, रविकांत गच्चे, अतूल कदम, प्रितम पुजारी, निखील खर्चे, विवेख राळेभात, विक्रांत चव्हाण, अभिजीत भोसले, योगेश पाटील, सचिन पांढरे, सोमनाथ कुडवे, प्रमोद मगर, रोहन पाटील, भागवत मुळीक, राजेंद्र यादव, गणेश खराडे (सर्व पोलीस उपनिरिक्षक) यां सर्व पोलीस अधिकाऱ्यांना नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ जाहीर झाले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur superintendent of police dr abhinav deshmukh and other officers awarded antarik suraksha seva padak aau
First published on: 11-06-2020 at 09:59 IST