íथक वादातून खून झाल्याचे निष्पन्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंबेडकरवादी चळवळीचे विचारवंत  प्रा. डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले यांच्या पाíथवावर शनिवारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाíथवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या खून प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

दरम्यान किरवले यांचा खून बंगल्याच्या व्यवहारातील आíथक वादातून झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. या प्रकरणी संशयित खुनी प्रीतम गणपती पाटील (वय ३२) याने किरवले यांचा बंगला खरेदी केला होता.  दोघांतील वाद विकोपाला गेल्याने प्रीतमने डॉ. किरवले यांचा शुक्रवारी राहत्या घरी खून केल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी प्रीतमची आई मंगला पाटील यांनी खुनातील पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केल्याने त्यांनाही सहआरोपी करून अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांनी दिली. दरम्यान हा खून परिसरातील सुतारकाम करणाऱ्या प्रीतम पाटील यानेच केल्याचे शुक्रवारी समोर आले होते. मात्र यामागील नेमके कारण अस्पष्ट होते.

डॉ. किरवले यांचे राजेंद्रनगर येथील राहते घर प्रीतम पाटील याने खरेदी केले होते. सहा महिन्यांपूर्वी किरवले यांनी याबाबतचा व्यवहार प्रीतमसह त्याच्या वडिलांशी केला होता. त्या वेळी घराची किंमत ४६ लाख रुपयांना ठरली होती. प्रीतमने किरवले यांना वेळोवेळी ३६ लाख रुपये दिले होते. मात्र किरवले आपणास २६ लाख रुपयेच मिळाल्याचे सांगत होते. या कारणातून प्रीतम व डॉ. किरवले यांच्यात वाद झाला होता. जानेवारीत डॉ. किरवले यांनी घराची किंमत आणखी २० लाख रुपयांनी वाढल्याचे प्रीतमला सांगितले. यातून या दोघांतील वाद विकोपाला गेला होता.

शुक्रवारी डॉ. किरवले, गणपती पाटील, प्रीतम पाटील यांच्यामध्ये करार झाला. यामध्ये बाजारभावानुसार किरवले यांच्या बंगल्याची किंमत २३ लाख रुपये नमूद करण्यात आली होती. याचकारणातून सायंकाळी प्रीतम चच्रेसाठी किरवले यांच्या घरी गेला होता. बंगल्याच्या खरेदी रकमेतील फरक व व्यवहारातील वाढीव रक्कम यातून किरवले व प्रीतम यांच्यात वाद झाला. याचरागातून प्रीतमने किरवले यांच्यावर वार करून खून केला, असे पोलिसांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krishna kirawale murdered in kolhapur
First published on: 05-03-2017 at 00:31 IST