भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकत्रे व माजी उपाध्यक्ष कृष्णराव सोळंकी यांचा शुक्रवारी भाजपा कार्यालयात सत्कार करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, महेश जाधव व भाजपा ज्येष्ठ कार्यकत्रे जयवंत उर्फ अण्णा पिसाळ यांच्याहस्ते विशेष कार्यगौरव सत्कार करण्यात आला. कोल्हापूर जिल्हयामध्ये सुरवातीच्या काळात भाजपाचे काम करणारे अत्यंत तळमळीचे कार्यकत्रे म्हणून कृष्णराव सोळंकी यांचेकडे पाहिले जाते. कोल्हापुरातील रेल्वे व रेल्वेची सुधारणा या विषयात लक्ष घातले. गेली ४० वष्रे त्यांनी वेगवेगळया विषयांत पत्र व्यवहार करत सरकारी स्तरावर कोल्हापुरातील रेल्वेच्या प्रश्नाबाबत वेळोवेळी काम केले आहे. प्रसंगी रास्ता रोको किंवा मोर्चा काढत कोल्हापुरातील रेल्वे प्रश्नाबाबत आवाज उठवला. या वेळी जिल्हा सरचिटणीस संतोष भिवटे, अशोक देसाई, विजय जाधव, सुभाष रामुगडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, अॅड.संपतराव पवार, श्रीकांत घुंटे, महिला आघाडी अध्यक्षा वैशालीताई पसारे, सुलभा मुजूमदार, भारती जोशी, किशोरी स्वामी, युवा मोर्चाचे दिग्विजय कालेकर, मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी, सुरेश जरग, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, अनिल काटकर, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, प्रभाताई टिपुगडे, गिरीष गवंडी, हर्षद कुंभोजकर, नचिकेत भुर्के, राजाभाउ कोतेकर, संदीप कुंभार, तौफीक बागवान, राजू मोरे, यशवंत कांबळे, राजू माळगे आदींसह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2016 रोजी प्रकाशित
कृष्णराव सोळंकी यांचा सत्कार
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकत्रे व माजी उपाध्यक्ष कृष्णराव सोळंकी यांचा शुक्रवारी भाजपा कार्यालयात सत्कार करण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 06-03-2016 at 01:48 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krishnarao solanki honour