कोल्हापूर :शिरोळचा विकास आराखडा दिनांक ५ मार्च रोजी प्रसिध्द झाला आहे. त्यामध्ये बऱ्याच शेतकरी, नागरीकांच्या जमिनी रस्ते, बगिचा, शाळा, खेळाचे मैदान यासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तो अन्यायकारक असल्याने बदलण्यात यावा अशी मागणी करत जमीन आरक्षण बचाव कृती समितीने विरोध केला आहे. याबाबत सोमवारी झालेल्या मेळाव्याला शिरोळकरांनी मोठा प्रतिसाद दिला. शिरोळ या तालुक्याच्या ठिकाणी नगर परिषदेची स्थापना वीस अठरा मध्ये करण्यात आली यानंतर आता शहराचा विकास होण्यासाठी विकास आराखड्याचा अहवाल पाहिला सादर केला आहे. दर दोन वर्षांनी एक टप्पा अशा पुढील दहा वर्षात पाच टप्प्यात जमानी आरक्षीत करण्याचा मसुदा जाहिर केला आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळमध्ये आज एक महत्त्वाचा मेळावा पार पडला. त्यामध्ये अनेकांनी परखड मते व्यक्त केली.

इतक्या जमिनी हव्यातच कशाला?

या मसुद्यानुसार पुढील दहा वर्षात शिरोळ शहरातील बहुतांश नागरिक, शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित होण्याची भीती आहे. या खेरीज नगरपरिषदेला इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनी आरक्षित करणे गरजेचे आहे का ? असा सवाल केला. शहरातील सर्वच नागरिकांनी आत्ताच एकजूट व एकसंघ होण्याची गरज आहे.

हेही वाचा >>> इचलकरंजीत उद्यापासून तीन दिवस शाहिरी महोत्सवाचे आयोजन; नाराजीचा डफ

आरक्षण अन्यायविरुद्ध लढा  

भविष्यात आरक्षणाचे संकट थोपवण्यासाठी एकत्रीपणे लढा उभारण्याची गरज आहे. आरक्षण अन्यायाविरुद्ध मी शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभा राहून शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन पृथ्वीराजसिंह यादव यांनी सोमवारी दिले.

पीडितांचा प्रतिसाद 

दरम्यान,नागरिकांच्या जमिनीवर रस्ते व इतर उपयुक्तीसाठी टाकलेल्या आरक्षणाच्या अनुषंगाने रविवारी कल्लेश्वर मंदिराच्या हॉलमध्ये पीडित शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश माळी होते.

हेही वाचा >>> कोल्हापूर : आचारसंहितेत भगवे झेंडे काढले; इचलकरंजीत हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध

पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले, आरक्षण टाकताना शेत जमिनीवर प्रामुख्याने रस्त्याचे आरक्षण टाकले आहे. यामध्ये भूमी संपादन  किंमत म्हणून प्रति गुंठ्याला १७ हजार ७४० रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना दर दिला आहे. याशिवाय शाळा, खेळाचे मैदान, बेघर, नगरपरिषद दवाखाना, बाग दफनभूमी यासाठी प्रति गुंठा १४ ते १५ हजार रुपये इतका मोबदला अहवालात नमूद केला आहे.

बैठकीत शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पीडित शेतकरी, नागरिक , कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते,असे पृथ्वीराजसिंह यादव, अध्यक्ष,जमीन आरक्षण बचाव कृती समिती यांनी सांगितले.

त्याचा तपशिल याप्रमाणे

पहिल्या टप्प्यात :

५ ठिकाणी, गार्डन व पार्क

१ ठिकाणी, खेळाचे मैदान,

१५ ठिकाणी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

४ ठिकाणी, दवाखाना व प्रसुती केंद्र

१० ठिकाणी, नगरपरिषद वापरासाठी जागा

दुसऱ्या टप्प्यात :

१६ ठिकाणी, कचरा वर्गीकरण जागा

१४ ठिकाणी, खेळाचे मैदान

3  ठिकाणी, बेगर लोकांच्यासाठी घर जागा

८  ठिकाणी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

९ ठिकाणी, भाजीपाला बाजार

तिसऱ्या टप्प्यात :

७ ठिकाणी, गार्डन पार्क

२ ठिकाणी, शाळा व ग्राउंड

२० ठिकाणी, दफनभूमी

१७ ठिकाणी, कत्तलखाने

चौथ्या टप्प्यात :

१९ ठिकाणी, सांडपाणी निस्सारण प्रकल्प

१८ ठिकाणी, मटन शॉप, फिश मार्केट

६  ठिकाणी, शॉपिंग सेंटर आणि पार्किंग

१३ ठिकाणी, नगरपरिषद वापरासाठी जागा

पाचव्या टप्प्यात :

११ ठिकाणी, गार्डन व पार्क

२१ ठिकाणी, खेळाचे मैदान

१२ ठिकाणी, शाळा व ग्राउंड