महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल येथे महाविकास आघाडीच्यावतीने गुरुवारी सायंकाळी विजयउत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी ढोल, फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून विजय साजरा केला.

हेही वाचा >>> विजय शिवसेनेचा अन वादाची घुसळण कोल्हापूर काँग्रेसच्या दोन गटात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. आघाडीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. या याप्रसंगी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेते उपस्थित होते. हा जनतेचा विजय असून महाविकास आघाडीचा एकजुटीचा विजय आहे. कसब्यातील जनतेने महागाई बेरोजगारी आणि बेकायदेशीर सरकारच्या विरोधात मतदान केले त्याबद्दल सर्व मतदारांचे अभिनंदन, अशा भावना काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, गुलाबराव घोरपडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहर अध्यक्ष सुनील मोदी यांनी व्यक्त केल्या. संपत पाटील, प्रताप जाधव, ईश्वर परमार, वैशाली महाडिक, लीला धुमाळ, हेमलता माने, चंद्रकला कांबळे, उपस्थित होते.