कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडे ३१ वर्षांपासून असलेली करवीर निवासिनी महालक्ष्मीची चांदीची मूर्ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली. महालक्ष्मी मंदिरात असणाऱ्या मूळ मूर्तीची अभिषेकांमुळे झीज होत असल्याने ही मूर्ती देण्याचा निर्णय सराफ संघाने घेतला होता. संघाच्या कार्यालयाशेजारी उभारलेल्या मंडपात सजवलेल्या ट्रॅक्टरवर मूर्ती ठेवून विधिवत पूजा करण्यात आली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, उर्वरित विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. रस्त्यावर भक्तांनी रांगोळय़ा काढल्या होत्या. रोषणाईही केली होती.

नगर प्रदक्षिणामार्गे शोभायात्रा महालक्ष्मी मंदिरात पोहोचल्यावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांच्याकडे अंबामातेच्या जयघोषात मूर्ती सुपूर्द करण्यात आली. सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, जितेंद्र राठोड, अनिल पोतदार, संजय जैन, रवींद्र राठोड यांच्यासह संचालक, भाविक, हिरव्या रंगाच्या साडय़ा परिधान करून महिला सहभागी झाल्या होत्या.

Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा