पोलीस कोठडीतील तरुणाच्या मृत्यू प्रकरणी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षकासह तिघा पोलिसांना न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेप सुनावली आहे. या खटल्यातील वकिलांचा अंतिम युक्तिवाद १९ जानेवारीला न्यायालयात झाला. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी आज खटल्याचा अंतिम निकाल राखून ठेवला होता.
ही घटना २३ ऑगस्ट २०१४ रोजी पेठवडगाव येथे घडली होती. येथील आंबेडकर चौकात सनी पोवार याने केएमटी बसवर दगडफेक केली होती. त्यामुळे सहायक फौजदार बबन िशदे यांनी त्याला वडगाव पोलीस ठाण्यात आणले होते. कोठडीत बंदिस्त केल्यानंतर दोन तासांनी सनी पोवारच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
या प्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संजीव पाटील, सहायक फौजदार बबन िशदे, पोलीस नाईक धनाजी पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून संशयित कळंबा कारागृहात बंदिस्त होते. त्यांना जामीनही झाला नाही. या प्रकरणी सरकारी वकील अशोक रणदिवे व संशयितांचे वकील अशोक राणे, हर्षद िनबाळकर, एम. डी. सुर्वे यांनी युक्तिवाद केला. आठ ते दहा महिन्यांपासून या खटल्याचे काम सुरू होते. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण घेऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी निकाल दिला. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.