कोल्हापूर : समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांनीच विरोध केला आहे. महायुतीचे पराभूत उमेदवार संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यापाठोपाठ आता भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे यांनीही सोमवारी महामार्गाला विरोध असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा >>> इचलकरंजीतील दोन माजी सभापती मध्ये विकास कामावरून वादावादी; पोलीस ठाण्यात तडजोड

जिल्ह्यातील कागलसह सहा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जात असल्याने त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसमवेत बामणी (ता. कागल) येथे घाटके यांनी सोमवारी बैठक घेतली. कागल तालुक्यातील सर्वाधिक ५०० एकर जमीन महामार्ग व अन्य सुविधांसाठी अधिग्रहित करण्यात येणार आहे. या जागेचीही घाटगे यांनी पाहणी केली.

शक्तिपीठमुळे पराभव

संजय मंडलिक यांनी आपल्या पराभवामागे शक्तिपीठ महामार्ग हे एक कारण असल्याचे म्हटले आहे. मुश्रीफ यांनीही याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याचे म्हटले आहे. हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सर्व विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनाही सामावून घ्यावे. त्यामुळे शासन पातळीवर याची गांभीर्याने दखल घेतली जाईल.– समरजीतसिंह घाटगे, भाजप नेते